Breaking News

रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ ; उरण विधानसभा महिला मोर्चाचा पुढाकार

उरण ः वार्ताहर  – उरण विधानसभा महिला मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ झाला. उरण विधानसभा महिला मोर्चाच्या संयोजिका तथा उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी सायली म्हात्रे यांनी रक्षाबंधन पर्वाची सविस्तर माहिती दिली.

हा कार्यक्रम उरण नगर परिषद सभा हॉल येथे झाला. उरण नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट, त्यांचे प्रतिनिधी, सदस्या व महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

या वेळी उरण विधानसभा महिला मोर्चाच्या संयोजिका तथा नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेविका यास्मिन गॅस, नगरसेविका आशा शेलार, नगरसेविका दमयंती म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, सीआरपी नीता ठाकूर, सारिका भोईर, एके कविता म्हात्रे महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply