Breaking News

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी

मुंबई : रामप्रहर वृत्त
राज्यातील अवकाळी पाऊस, भीषण गारपीट, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा गंभीर प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. या प्रश्नाच्या माध्यमातून नाशिक, कोकण, रायगड, विदर्भ, मराठवाडा, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, अहिल्यानगर, सांगली, संभाजीनगर व बीड यांसह विविध जिल्ह्यांमध्ये मार्च-एप्रिल २०२६मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल, फळबागा, घरे, जनावरे तसेच जीवित व वित्तहानी झाल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला.
राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. राज्यात विशेषतः नाशिक, कोकण, रायगड, विदर्भ, मराठवाडा, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, अहिल्यानगर, सांगली, संभाजीनगर व बीड यासारख्या अनेक जिल्ह्यात माहे मार्च-एप्रिल २०२६मध्ये झालेला अवकाळी पाऊस, भीषण गारपीट, वादळी वारा, बदललेले हवामान व इतर नैसर्गिक आपत्ती, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानीसह शेतमाल, घरे, जनावरे, पीक, फळ बाग व फळांवरील रोगांचा प्रादुर्भाव, पशुधन व जनावरांचा मृत्यू इत्यादी स्वरूपाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल. ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून पावसामुळे वाळवणीसाठी ठेवलेल्या हळदीचे नुकसान, बऱ्याच ठिकाणी वीज पडून व नैसर्गिक आपत्तीमुळे दगावल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे महसूल व कृषी विभागाकडून पाहणी करून त्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे तसेच संबंधित पथके गावांमध्ये अनुपस्थित असल्याने पंचनामे पूर्ण झाले नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हेही खरे आहे काय? असल्यास अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून मदत निधी वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविणे, डीबीट अर्थात थेट लाभ हस्तातंरण पद्धतीने मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी शासनाने पंचनामे पूर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनास विशेष निर्देश दिले आहेत काय? असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? त्या अनुषंगाने हवामानाच्या अंदाजाची अचूकता सुधारण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व पशुपालकांना आर्थिक मदत, पीकविमा, जनावरांच्या नुकसानीची भरपाई देणे, मृतांच्या वारसांना मदत तसेच वीजपुरवठा पूर्ववत व वीज प्रतिबंधक यंत्र बसविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल केला होता.
यावर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, राज्यात विशेषतः नाशिक कोकण, रायगड, विदर्भ, मराठवाडा, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, हिल्यानगर सांगली, संभाजीनगर व बीड यासारख्या अनेक जिल्ह्यात माहे मार्च-एप्रिल २०२६मध्ये झालेला अवकाळी पाऊस, भीषण गारपीट, वादळी वारा, बदललेले हवामान व इतर नैसर्गिक आपत्ती, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानीसह शेतमाल, घरे, जनावरे, पीक, फळ बाग व फळांवरील रोगांचा प्रादुर्भाव, पशुधन व जनावरांचा मृत्यू इत्यादी स्वरुपाचे नुकसान झाले असल्याचे खरे आहे. हळदीचे नुकसान झाल्याची बाब आढळून आलेली नाही. काही ठिकाणी वीज पडून व नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित हानी झाली आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डिबीटी प्रणालीद्वारे निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहाय्य व जखमींना तातडीने मदत करणे शक्य व्हावे तसेच पशुहानी झाल्यास पशुधन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत वाटप करणे शक्य व्हावे म्हणून उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीची नोंद घेऊन महावितरणकडून तत्काळ दुरूस्तीची प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Check Also

वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्म नोंदीप्रकरणी तीन आरोपी अटकेत

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीमध्ये बनावट जन्म नोंदणी …

Leave a Reply