Breaking News

नगरसेवक राजू सोनी यांची समाजसेवा स्वखर्चाने बसविले पेव्हर ब्लॉक

पनवेल ः वार्ताहर – श्री नवनाथ मंदिर मिडलक्लास सोसायटीे येथे सतत पडणार्‍या पावसामुळे पावसाचे पाणी साठून मंदिरात जाण्याच्या वाटेवर पाणी साचून राहायचे व येथे नेहमी चिखल जमा व्हायचा. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना त्रास सहन करावा लागत असे.

हे नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी स्वखर्चाने पेवर ब्लॉक बसवले, तसेच त्या ठिकाणी पोल व स्ट्रीट लाईट नसून येथे अंधार पडत असल्याने महापालिकेला लेखी पत्र देऊन येथे लवकरात लवकर पोल व लाईट बसवण्यात यावी, अशी मागणी केली.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply