Breaking News

एक आमदार तोही दमदार!

आपल्या पायाशी सर्व प्रकारची सुखे लोळण घेत असतानाही त्या सुखाचा उपभोग न घेता निव्वळ लोककल्याण आणि लोकसेवेसाठीच तन-मन-धनाने आपले सर्वस्वी जीवन निःस्वार्थीपणे अर्पण करणारे सिडकोचे अध्यक्ष, कार्यक्षम आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

मैनै ऐसा सोचा है… ये जो मेरा पनवेल है, इसे मॉडेल बना दूंगा। बाकी लोग आके देखना चाहिये कि, देखो भाई, प्रशांत ठाकूरने सचमुच पनवेल बहुत अच्छा बनाया करके। या वेगळ्या ध्येयाने प्रेरित होऊन पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार कामे सुरू करून आपली ध्येयपूर्ती साध्य करण्यात आमदार प्रशांतदादा ठाकूर सफल होत आहेत. अनेक प्रकारच्या लोकोपयोगी सार्वजनिक सुधारणा घडवून त्यांनी पनवेल तालुक्याचे रूपडेच पालटून टाकले आहे. राजकीय क्षेत्रात पदार्पण करताना एक कार्यकर्ता, नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा दमदार प्रवास करीत लोकप्रियतेचा कळस गाठणार्‍या त्यांच्या यशस्वी प्रयत्नांस सलाम!

लोकांना नुसता रस्ता दाखवून लोक त्यावर चालत नाहीत. त्यांना दिशा दाखविली पाहिजे, त्यांच्यासोबत चालले पाहिजे. या सामाजिक वैचारिक भावनेने प्रेरित होऊन जनतेत राहून, लोकांमध्ये मिसळून जनसंपर्क घनिष्ठ करून लोकांना उत्कर्षाच्या व विकासाच्या योग्य दिशेने नेण्याचा त्यांचा हातखंडा कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्येक निमंत्रणाची आठवण ठेवून त्यांच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांना आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व वाखाणण्याजोगे आहे.

आपण करीत असलेले काम हे केवळ कुणाला तरी वाटते म्हणून करायची गोष्ट नाही. हे काम करण्यात आपल्याला आनंद, समाधान मिळते यापलीकडेही ती अधिक जबाबदारीने करायची गोष्ट आहे, या त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सान्निध्यातील कार्यकर्तेही जबाबदारीने वागतात. प्रत्येक कार्यात यश देणारी गोष्ट म्हणजे शिस्त! या शिस्तीचे काटेकोरपणे पालन कार्यकर्त्यांकडून व्हावे यासाठी ते नेहमी सतर्क असतात. आपल्याकडे कामानिमित्त आलेली माणसं मग त्यात तक्रारदार असो वा मागणी करणारे असो, त्यांचे संपूर्णपणे ऐकून घेऊन त्यांना योग्य तो न्याय देण्याची त्यांची हातोटी बरंच काही सांगून जाते. जागेवरच लोकांची गार्‍हाणी ऐकून संबंधित असलेल्या अधिकार्‍यांशी ताबडतोब संपर्क साधून लोकांच्या तक्रारींचे काटेकोरपणे निवारण होत असल्याने लोक खात्रीने त्यांच्याकडे येतात. माझ्या माणसाला कुणासमोर हात पसरावे लागू नयेत, त्यांना त्यांचे अधिकार कळावेत, आपले अधिकार मिळवण्याची कुवत आणि हिंमत त्यांच्यात यायला हवी हे माझे स्वप्न आहे, असे म्हणत ते लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात, तसेच शैक्षणिक मदतीचा हातही पुढे करतात, हे सर्वश्रुत आहेच. बेरोजगारी वाढू नये म्हणून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने आपल्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा आयोजित करून त्यांनी अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना नोकर्‍या मिळवून दिल्या आहेत. लोकांचे भले व्हावे, त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाव्यात, लोक सुखाने नांदावेत, लोकांचे हाल वा नुकसान होऊ नये यासाठी सतत जागृृत असणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी टोलप्रकरणी लोकांवर झालेल्या अन्यायाविरुध्द निषेध म्हणून आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देऊन खर्‍या लोकप्रतिनिधीची एक मोठी ओळखच दाखवून दिली.

सतत लोकसेवेत रमणारे, जनतेच्या सुखाचा ध्यास घेणारे, न थकता सर्वात पुढे चालणारे, स्पष्टवक्ते, दूरदर्शी, जनमानसात मिसळणारे, उमदे व्यक्तिमत्त्व असणारे, कुशल, कार्यक्षम आमदार प्रशांतदादा ठाकूर आम्हा पनवेलकरांना आमदार म्हणून लाभले आहेत व येणार्‍या काळात म्हणजेच भविष्यात ते आम्हा पनवेलकरांना व महाराष्ट्राला एक मंत्री म्हणून लाभोत हीच सदिच्छा! लोकांच्या समस्यांचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेले हास्य व समाधान पाहून आमदार प्रशांतदादांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. आपल्या हातून चांगली लोकसेवा घडून लोकांसाठी अर्थात सर्व समाजासाठी आपण खरोखरंच कामी येतो या विचाराने ते हरखून जातात. मागासवर्गीय समाजासाठी तर ते बाह्या सरसावूनच अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने चढाई व लढाई करण्यास तत्पर असतात व यशस्वी होतात. मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा प्रश्न असो वा बुद्ध विहारांचा प्रश्न, सामाजिक मंदिरांचा प्रश्न असो, तसेच पुतळ्यांचा प्रश्न या सर्व गोष्टीत अग्रेसर राहून, कायदेशीर बाबींचा अभ्यास करून, वेळेला ताठर भूमिका घेऊन प्रत्येक कार्यात यशस्वी झाल्यामुळे मागासवर्गीय व बहुजन समाजातील लोकांच्या हृदयात त्यांच्याबद्दलचा आदर आणि आदर्श निर्माण झाला आहे, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. कारण मी या सर्व घटनांचा-घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. लोकनेते, बहुजन गुरुवर्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने पक्षाने मला मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे नेतृृत्व करण्याची जबाबदारीची संधी दिल्यामुळे मागासवर्गीयांच्या न्याय-हक्कांच्या लढाईत मी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलो आहे. त्यामुळेच त्यांची कार्यपद्धती, त्यांचे वागणे, बोलणे, शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणे, यश संपादन करण्याची हातोटी वगैरे गोष्टी शिकून आत्मसात करता आल्या याचा मला सार्थ अभिमान आहे.

एखादी दुर्घटना घडल्यास ताबडतोब तेथे जाऊन सर्व प्रकारची वैयक्तिक मदत करतात. त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावाही करतात. पूर-महापुरामुळे पाणी साचून जनजीवन ठप्प होते. काहींच्या मालमत्तेचे तसेच घराचेही नुकसान होते. अशा वेळी पावसाची संततधार, वादळी वार्‍याची पर्वा न करता आमदार प्रशांतदादा त्यांच्या मदतीला आवर्जून धावून जातात. यंदाही 24 जुलैपासून बरसलेल्या मुसळधार पावसात आपत्तीग्रस्त भागात जाऊन लोकांना सर्वतोपरी वैयक्तिक मदत करून त्यांनी दिलासा दिला. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य वा व्यावसायिक प्रत्येक क्षेत्रात स्वतः परिपूर्ण असल्याने माझ्या लोकांनाही त्याचा लाभ मिळावा म्हणून निव्वळ त्यांच्या वाढदिवशीच नव्हे; तर इतर दिवशीही ते वेळोवेळी उपरोक्त क्षेत्रांतील व्याख्याने, शिबिरे, कार्यशाळा यांसारखे उपक्रम राबवतात. अशा या आमच्या क्रियाशील, कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, जबाबदार, लोकाभिमुख, उदारमतवादी, नैतृत्व गुणसंपन्न, राष्ट्रपुरुषांचा आदर करणारे व आदर्श घेणारे, शिक्षणप्रेमी, कला-क्रीडानिपुण, सर्वधर्मसमभावी आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

-प्रकाश बिनेदार, नगरसेवक

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply