Breaking News

गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शिक्षक कार्यशाळा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शिक्षकांसाठी व विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शासकीय अध्यापक महविद्यालय पनवेल, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 8) तालुक्यातील शिक्षकांसाठी स्कॉलरशिप व बाल विज्ञान परिषद या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे केले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ, प्रा. भोसले, मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव  जयश्री वाघ, खजिनदार अंतुले, सल्लागार कुंभार व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या सत्रात राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे यांनी विद्यार्थांनी प्रकल्प कसे निवडावे, प्रकल्प कार्यवाही व प्रकल्प सादरीकरण याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात नूतन माध्यमिक विद्यालय चेंबूर येथील राजाराम पवार यांनी स्कॉलरशिप परीक्षा स्वरूप व बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करताना उदाहरणे कमी वेळात कशी

सोडवयाची या संदर्भात काही क्लृप्त्या सांगितल्या, तसेच श्री. जकाकुरे यांनी गणित या विषयावर मार्गदर्शन करताना संख्या, व्यवहारिक गणित, कालमापन यावरील विविध उदाहरणातून काही क्लृप्त्या सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील यांनी केले. या कार्यशाळेत तालुक्याच्या विविध शाळांतून 135 शिक्षक उपस्थित होते.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply