Breaking News

गव्हाणच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

गव्हाण-येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिज्योत  अर्थात क्रांती मशाल प्रज्वलित करून शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली.

या वेळी सागर रंधवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व स्पष्ट करून स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या त्याग व बलिदानाविषयी भाषण केले. आर्या म्हात्रे या विद्यार्थिनीने क्रांतिकारकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत को. ऑप. बँकेचे संचालक तथा संस्थेचे लाइफ वर्कर प्रमोद कोळी, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, जे. एच. माळी, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, प्रा. राजेंद्र चौधरी, वाय. एस. पाटील, सी. एन. ठाकूर, सी. एम. पाटील, प्रसन्न ठाकूर, एकनाथ ठाकूर, गणेश भोईर, चंद्रकांत पाटील, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, ग्रंथपाल महेश म्हात्रे, दयानंद खारकर, तसेच सर्व सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योत्स्ना ठाकूर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर दिव्येश पाटील या विद्यार्थ्याने आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply