Thursday , March 23 2023
Breaking News

होळी, धूळवड उत्साहात

महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीने राबवला उपक्रम

उरण ः प्रतिनिधी

उरण शहरात होळी व धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी लहानथोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक एकमेकांना रंगवून आपला सण साजरा करताना दिसत होते. बुरा न मानो होली है, असे म्हणत रंगवून घेताना व रंगविताना नागरिक या

सणाचा मनमुराद आनंद घेत होते. उरण शहरातील कामठा येथील राधाकृष्ण मंडळ, द्वारकानगरी, राजपाल नाका, स्वामी विवेकानंद चौक, कुंभारवाडा आदी ठिकाणी धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उरण शहरात विवेकानंद चौक येथील महेशशेठ बालदी मित्रमंडळाच्या वतीने उरण शहरात जाणार्‍या व शहरातून मोरा गावाकडे जाणार्‍या नागरिकांना इकोफ्रेंडली रंगांनी रंगवून धूळवड साजरी करण्यात आली. याप्रसंगी महेश बालदी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेशशेठ बालदी, नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक धनंजय कडवे, सुनील पेडणेकर, संतोष ओटावकर, उद्योजक चंद्रहास घरत, परेश तेरडे, माजी नगरसेवक राजेश कोळी, सचिन चिपळूणकर, मनोहर सहतीया, अभिषेक जैन, शैलेश पोतदार, जितेंद्र पटेल, मनन पटेल आदी  उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply