
कर्जत ः रामप्रहर वृत्त
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी कर्जत मंडळातील कळंब, पिंपळोली, दहिवली, खांडपे, वेणगाव या ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन कर्जत विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्डच्या आढावा बैठका संपन्न झाल्या. याप्रसंगी पोटल ग्रामपंचायतमधील पोटलवाडी येथील सलिम लतिफ मालदार यांची कर्जत तालुका अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर सलिल हसमिया तांबोळी यांची कळंब जिल्हा परिषद विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, कार्यालयीन सचिव परशुराम म्हसे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष फुरकान कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल खंबाळे, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर भगत, तालुका चिटणीस जीवन मोडक, तालुका उपाध्यक्ष सचिन म्हस्कर, पेण प्रकल्प अध्यक्ष संजय सावळा, तालुका चिटणीस पंकज पाटील, राजेंद्र जाधव, राहुल बदे, शत्रुघ्न शिंगोले, सतीश काळेकर, संतोष गवळी, यशवंत डोंगरे, भगवान ऐनकर, केशव तरे, संदेश कराळे, प्रमोद पाटील, गुरुनाथ सोनवणे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper