Breaking News

पेणमधील दादर गावातील विकासकामांचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील दादर येथील विविध विकासकामांचे सोमवारी (दि. 24) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यापुढील जिल्हा परिषद सदस्य दादर गावातीलच होणार असून, गावात लवकरच अस्थी विसर्जन घाटासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी दिली. पेण तालुक्यातील दादर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण, जुना तलाव सुशोभीकरण, पूरनियंत्रण संरक्षण बंधारा, अंगणवाडी इमारत, अंतर्गत रस्ते, निवारा शेड, परिसर सुशोभीकरण, रस्ते काँक्रीटीकरण, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती,  लादी बसविणे आदी 16 विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यांचे भूमिपूजन सोमवारी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दादर गाव माझे असून मी या गावचा हक्काचा माणूस असल्याने हा निधीच नाही तर यापेक्षाही जास्त निधी देऊन या गावाला झुकते माप द्यायचे आहे. सध्या दादर हे भांडण विरहित गाव झाले आहे. यापुढे गावाला सुजलाम सुफलाम करायचे आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या ठिकाणी संरक्षक बंधारा बांधून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर यापुढील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा सदस्य हे दादर गावातीलच असतील, असा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, दादर सरपंच विजय पाटील, पं. स. माजी सभापती नाशिकेत पाटील, माजी सरपंच मोहन नाईक, गोरखनाथ पाटील, गजानन पाटील, प्रल्हाद पाटील, मोहन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भरत पाटील यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply