Breaking News

जीएमबीएफ ग्लोबल, महावीर आरोग्य संघाचे अतुलनीय कार्य

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना दिलासा

अलिबाग ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपले योगदान देत आहे. त्यामध्ये जीएमबीएफ ग्लोबल आणि महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी या संघाचेही योगदान नक्कीच दखलपात्र आहे. महावीर आरोग्य सेवा संघ हा मास्क ग्रुप संचलित आहे. या संघाचे संचालक प्रसाद दोशी आहेत. ते जीएमबीएफ ग्लोबल फोरम दुबईचे कार्यरत सदस्य आहेत. इतर सदस्यांबरोबर त्यांचे या फोरमसाठी महत्त्वपूर्ण काम आहे.

मागील तीन महिने संपूर्ण जग कोरोनाने प्रभावित झाले आहे. कोरोनामुळे जी काही आर्थिक आणि मनुष्यहानी झाली ती धक्कादायक आहे, पण अशा हानीतूनही भारतीय लोकांची माणुसकी शाबूत असल्याचे दिसले. भारताचा नागरिक जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात राहत असला तरी तो आपल्या माणसांसाठी धावून जातो हे दिसून आले. जीएमबीफ ग्लोबल आणि महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी यांनीही ती माणुसकी दाखवून दिली. प्रसाद दोशी यांनी जीएमबीएफ ग्लोबलसोबत या सेवाभावी कार्यात स्वतःला वाहून घेतले.

महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी हा एक सेवार्थ दवाखाना आहे, अशी माहिती संघाचे संचालक प्रसाद दोशी आणि जीएमबीएफ ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी दिली. महावीर सेवा संघाने वर्षभरात 38 हजार 600 रुग्णांवर उपचार केले आहेत. 19 आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. कोरोनाच्या महामारीतही आरोग्य सेवा संघाने उत्तम कामगिरी केली. 30 हजार मास्क, 30 हजार सॅनिटायझर बॉटलचे मोफत वाटप केले.

गरिबांसाठी मोफत जेवण आणि दररोज शिधासामुग्री मोठ्या प्रमाणात वितरित केली. पोलीस आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना मोफत नाष्टा दिला. बेवारस गुरांना चारा उपलब्ध केला. यासाठी करुणा मंदिर पुणे यांचे त्यांना सहकार्य मिळाले. संघाचे अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सतीश पखाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विश्वस्त विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपत आहेत, असेही प्रसाद दोशी यांनी सांगितले. कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणार्‍या पत्रकारांचाही डॉ. सुनील मांजरेकर यांच्या पुढाकाराने विशेष सन्मान केला. या महामारीतून सावरण्यासाठी जीएमबीफ ग्लोबल आणि महावीर आरोग्य सेवा संघाचा खारीचा वाटा आहे, असे प्रसाद दोशी आणि डॉ. सुनील मांजरेकर यांनी नमूद केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply