श्रीवर्धन : प्रतिनिधी
नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार शिंपी समाजातील ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज नामदास यांना जाहीर झाला असून, गुरुवारी (दि. 15) सकाळी पनवेलमध्ये होणार्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे.
गोवा मुक्तिसंग्रामात तुळशीराम बाळकृष्ण उर्फ हिरवे गुरुजी शहीद झाले. हु. हिरवे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नामदेव शिंपी समाज युवक संघाने यंदापासून शिंपी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीला हु. हिरवे गुरुजी समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार यंदाच्या पहिल्या पुरस्कारासाठी निवड समितीने संत नामदेव महाराज यांचे 17वे वंशज ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज यांची निवड केली आहे. स्वातंत्र्यदिनी गुरुवारी सकाळी 11 वाजता पनवेलमधील हुतात्मा स्मारकात होणार्या कार्यक्रमात ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज यांना हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उर्मिलाताई प्रभाकर भुतकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.