Tuesday , February 7 2023

स्वच्छ सर्वेक्षण होतंय अस्वच्छ पद्धतीने!

म्हसळा : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्‍याच्या ठिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगविलेल्या जाहिरातींखाली शेण व अन्य कचरा तसाच पडून आहे.  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने म्हसळा नगरपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु 20 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नगरपंचायत हद्दींत भिंती रंगविणे, फ्लेक्स लावणे या कामांसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी कचर्‍याच्या ढिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबतच्या भिंतींवरील जाहीरांतींखाली शेण व अन्य कचरा तसाच आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाच्या अ‍ॅपमधील प्रश्नावलीना अभ्यासू व समर्पक उत्तरे देवून शहरांतील नागरिकांनी मूल्यांकन द्यायचे आहे. त्यासाठी प्रशासनामार्फत प्रसिध्दी व जनजागृती केली जाते. मात्र म्हसळा नगरपंचायत कर्मचारी शासनाच्या या आदेशाला बगल देऊन शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरून स्वत:च मूल्यांकन करून घेत असल्याचे पुढे येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. या अभियनाची राज्य शासनाच्या पातळीवरून अंमलबजावणी होत असून, त्या अंतर्गत कचरा संकलन, वाहतूक, कचर्‍यावरील प्रक्रिया, घराघरातून उचलला जाणारा कचरा, त्याचे प्रमाण, कचरा वर्गीकरण, शौचालये, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतेबाबत सुविधा यासंदर्भातील उपाययोजना आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून ही माहिती घेण्यासाठी म्हसळ्यात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणे महत्वाचे आहे.

मी नाशिक येथे ट्रेनिंगमध्ये आहे, वरिष्ठांच्या आदेशावरुन मी कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करून घेतले.

-प्रशांत करडे, लिपीक, नगरपंचायत, म्हसळा

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply