उलवे : रामप्रहर वृत्त
उलवे ग्रामपंचायतीच्या वतीने 10 टक्के महिला बालकल्याण योजनेंतर्गत विधवा महिलांना ग्रामपंचायत निधीतून सहाय्य अनुदान वाटप करण्यात आले. या वेळी पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरपंच कविता खारकर यांची प्रमुखउपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला भाजप उलवा अध्यक्ष राजेश खारकर, युवा अध्यक्ष नीलेश खारकर, सदस्य रूपेश पाटील, रंजना गायकवाड, माजी सरपंच व कविवर्य पुंडलिक म्हात्रे, ग्रामसेवक मोरेश्वर मोकल, मोतीलाल मढवी गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.