
महाड : प्रतिनिधी
महाड आणि पोलादपुर तालुक्यांमध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली. सार्वजनिक दहीहंडीप्रमाणे खाजगी दहीहंड्या देखील बांधण्यात येतात. शहरांमध्ये शिवसेना पुरस्कृत सर्वात उंच हडी बांधण्यांत आली असुन शिवाजी चौक मित्र मंडळाने दखील दहीहंडी फोडणार्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. या वर्षी पुरामुळे अनेकांचे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम दहीहंडीच्या सणावर झाला आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीचा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये खाजगी दहीहंड्या 337, तर सार्वजनिक 250 दहीहंड्या लावण्यात येणार असल्याची नोद पोलिसाकडे करण्यात आली असल्याची माहिती महाड उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांनी दिली. महाड शहरांमध्ये कुंभारआळी, काकरतळे, कोटेश्वरी तळे, नूतन मित्र मंडळ नवी पेठ, नवे नगर या परिसरांमध्ये देखील दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये पार पडला. शिवाजी चौक मित्र मंडळ आणि आमदार भरत गोगावले मित्र मंडळ या दोन गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित केली. शिवाजी चौक मित्र मंडळाने सात थराची हंडी फोडणार्या पथकाला 22 हजार 222 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दोन्ही गोविंदा पथकाने पुरुष आणि महिला असे दोन गट केले होते. महाडप्रमाणे वरंध, बिरवाडी, वाळण, शेल कुसगाव खैरे, विन्हेरे, नाते, दासगाव या गावांतून देखील कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper