Breaking News

रायगडात दहीहंडीचा थरार

पायरीची वाडी शाळेतील बालगोपाळांनी साजरी केली ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’

पाली, बेणसे : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीची वाडीच्या बालगोपळांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आळस, अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धेची हंडी फोडत अनोख्या पद्धतीने ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ उत्सव साजरा केला. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना विषेश महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून आहे याचे सर्वात जास्त श्रेय येथील सण आणि उत्सवानांच आहे. कारण प्रत्येक सण देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पायरीची वाडी शाळेत नेहमीच संस्कारक्षम व आदर्श समाज निर्मितीच्या दुष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.शाळेचे उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी का साजरी केली जाते याबाबत मार्गदर्शन करत गोपाळकाला सणाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांची गावातून जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. यात सर्वांनी सहभागी होत ‘अंधश्रद्धा नको श्रद्धा हवी’, ‘स्वच्छता का रखना हमेशा ध्यान तभी तो बनेगा भारत महान’, ‘पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा’, ‘नष्ट करा अंधश्रद्धेचा अंधकार विज्ञानाने होईल उद्याचा उषःकाल’ यासारख्या घोषणा दिल्या. आपल्या जीवनातून आळस, अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धेला हद्दपार करा, याबाबत विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. तद्नंतर कुणाल पवार यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दहीहंडी व दोराला प्रबोधनात्मक फलक बांधत मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र दहीहंडी बांधून घेतली. केळी, हार, फुले, फुगे व प्रबोधनात्मक फलकांमुळे दहीहंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतल्या बालगोपाळासोबत शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक यांनीही गोविंदा, गोविंदा म्हणत विविध गाण्यावर ताल धरला. मुलींनी दोन थर रचले. सिद्धी खाडे या विद्यार्थिनीने मुलींची दहीहंडी फोडली, तर मुलांची दहीहंडी आर्यन जाधव या बाळगोपळाने फोडली.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply