Breaking News

यशवंत खंडागळे भाजपत दाखल

कडाव : प्रतिनिधी

भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. विविध राजकिय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राजकारणापासून अलिप्त असलेले प्रतिष्ठित नागरिकही भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. गुरुवारी (दि. 11) पोटल (ता. कर्जत) येथे विलास श्रीखंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली येथील चेहरा यशवंत चंदर खंडागळे यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षाचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनी भाजपमध्ये स्वागत केले. या वेळी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पवार, तालुकाध्यक्ष जयदास जाधव, सोशल मीडिया सेलचे जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, अल्पसंख्याक सेलचे तालुका उपाध्यक्ष सलिम मालदार, उमरोली पंचायत समिती गटाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply