Breaking News

एसईएस टॉपवर्थ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार

पाली : प्रतिनिधी

राज्य भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने दिला जाणारा स्काऊट-गाइड राज्य पुरस्कार येथील एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यापैकी सेजल जाधव या विद्यार्थिनीचा सत्कार नुकताच दादर येथे शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या सेजल जाधव, अश्विनी रावताळे, स्नेहल कुर्ले, तन्वी पवार, सिद्धी देशमुख, कुलदीप चव्हाण, मधुसूदन देशमुख, यशोदीप शिंदे, उमेश बाविस्कर आणि ओंकार देशमुख (सन 2017-18) आणि आर्शिना सेदा, सृष्टी कदम, कार्तिका शिंदे, श्रेया जंगम, सलोनी मुजुमदार, मिहीर कुलकर्णी, मंथन कारेकर, अथर्व मानकर, अब्रार शेख, अनिश मांगुलकर (सन 2018-19) हे विद्यार्थी स्काऊट-गाईड राज्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना विद्यालयातील शिक्षिका व गाईड कॅप्टन वंदना सुरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सुप्रिया गणेश कोणकर यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply