Breaking News

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे समन्वयक म्हणून आलेले आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले.
या वेळी व्यासपिठावर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जि. प. अध्यक्ष अ‍ॅड. निलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
आमदार लाड पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले होते की, तू कधी जेलमध्ये जाशील, मला कधी जेलमध्ये घालतील हे आपण सांगू शकत नाही. प्रवीण दरेकरांचीदेखील चौकशी लावली होती. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेते आणि पदाधिकार्‍यांना जेलमध्ये टाकण्याचे स्वप्न मनात बाळगले होते, मात्र त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही आणि होणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply