
उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे बुधवारी (दि. 18) गरजू विद्यार्थ्यांना धुतुम गावाचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती धनाजी ठाकूर यांच्यातर्फे मोफत पाठ्यपुस्तके व वह्यावाटप करण्यात आले. वह्यावटपाबरोबर इयत्ता नववी, दहावी आणि अकरावी सायन्स पाठ्यपुस्तकाचे प्रत्येकी 10-10 संच विद्यालयातील ग्रंथालयास भेट दिले. जेणेकरून गरजू आणि होतकरू विद्यार्थी ग्रंथालयाच्या माध्यमातून या पाठ्यपुस्तकांचा उपयोग त्या त्या वर्षी शैक्षणिक अभ्यासाकरिता करू शकतील.
या वेळी उद्योगपती धनाजी ठाकूर, विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, उपमुख्याध्यापक यू. एम. खाडे, पर्यवेक्षक आशा मांडवकर, जी. सी. गोडगे, ग्रंथपाल डी. ए. घरत, एच. एन. पाटील, दर्शना माळी, डी. डी. पाटील, एस. एम. भोईर उपस्थित होते. धनाजी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त आणि अभ्यास यांची सांगड घालून स्वतःची सर्वांगीण प्रगती साधावी, असे आवाहन केले आणि यापुढेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper