Breaking News

बामणगावील ग्रामस्थ भाजपत

सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत, उपसरपंच मेघा थळे, सदस्य ममता भादाणकर, चैताली पाटील, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. भाजप राज्य परिषद सदस्य सतीश लेले, अलिबाग मुरूड विधानसभा सरचिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, विस्तारक  महामुणकर, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, तालुका चिटणीस नितीन गुंड, ज्येष्ठ नेते अण्णा देशमुख, अलिबाग तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, कुर्डूस विभाग अध्यक्ष अमित पाटील, बामणगाव बूथ अध्यक्ष अविनाश भादानकर, युवा नेते शैलेश नाईक, अभिजित म्हात्रे, सागर पेरेकर, मिठालाल परमार आदी पदाधिकार्‍यांसह भाजप कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply