उरण ः वार्ताहर
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे रायगड जिल्हा प्रभारी तथा नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक मुनव्वर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा दौरा नुकताच करण्यात आला. या दौर्यात रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याकांनी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चात महाड येथे प्रवेश केला. या वेळी रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शहनवाज मुकादम, रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस रय्यान तुंगेकर, जिल्हा सचिव आदम डावरे, जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक बबलू सय्यद, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष कमरुद्दीन मांडलेकर व तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष उपस्थित होते.