Breaking News

म्हसळ्यात गोवंश चोरीची घटना

म्हसळा : प्रतिनिधी

चरायला सोडलेला बैल रात्री ठरल्या वेळी घरी न आल्याने शेतकरी सदानंद गोविंद काते (वय 48, रा. सावर, ता. म्हसळा) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हकीगत ऐकली, पण पोलिसांनी चोरीची नोंद न केल्याने काते यांनी शहर व तालुका हिंदू समाजाच्या अध्यक्षांकडे आपले गार्‍हाणे मांडले. त्यांनी आग्रह धरल्यामुळे म्हसळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि त्यानंतर केवळ 8 ते 10 तासांत आरोपीला अटकही केली.

गोवंशाची तस्करी करणारी टोळी दक्षिण रायगडसह म्हसळे तालुक्यात सक्रीय असावी, अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरू असतानाच म्हसळा शहरानजीकच्या सावर गावातील एका शेतकर्‍याचा बैल चोरीला गेला, मात्र  शेतकरी सदानंद काते यांनी घटनाक्रम सांगूनही पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. त्यामुळे काते यांनी हिंदू समाजाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली.

हिंदू समाजाचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील, शहर अध्यक्ष सुभाष ऊर्फ बाळशेट करडे, बजरंग दलाचे बाबू बनकर व अन्य पदाधिकार्‍यांनी शेतकरी सदानंद काते यांच्यासह म्हसळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांची भेट घेऊन बैलचोरीच्या घटनेची प्रथम नोंद करावी, असा आग्रह धरला.

घटना व साक्षीदार यांची पडताळणी, तसेच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अखेर भादंवि 379, 511, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा नोंदविल्यापासून केवळ 8 ते 10 तासांत आरोपीला अटक केले असल्याचे तपासी अमलदार हेेेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply