Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ

पनवेल ः प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे  बुधवारी (दि. 2) गांधी जयंतीनिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, आशा मांडवकर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी मिळून तंबाखू मुक्तीची आणि स्वच्छतेची शपथ घेतली. के. जी. म्हात्रे, दिनेश सासवडे, आशा मांडवकर, प्राचार्य मोहन पाटील यांनीही आपल्या मनोगतात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या कार्याची माहिती सांगितली, तसेच तंबाखू आणि ई-सिगारेटच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यांना आरोग्याचे आणि पर्यावरण स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply