Breaking News

विनोद घोसाळकर यांची माणगावात प्रचारफेरी

माणगाव : प्रतिनिधी

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रचाराने वेग घेतला असून, महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांसह माणगाव बाजारपेठेत प्रचार दौरा केला. या वेळी विनोद घोसाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.  या वेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, अ‍ॅड. राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, अजित तार्लेकर, भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, सरचिटणीस योगेश सुळे यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply