Breaking News

शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती दोर आवळल्याने तरुणाचा मृत्यू; नागपूरच्या लॉजमधील घटना

नागपूर : प्रतिनिधी

महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते व त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी टाकली होती. हीच दोरी तरुणासाठी जीवघेणी ठरली. मृत तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. एकत्र वेळ घालवण्यासाठी दोघे खापरखेडा येथील लॉजवर आले होते. शरीरसुखाचा आनंद घेत असताना महिलेने त्या तरुणाचे हात-पाय नायलॉनच्या रश्शीने खुर्चीला बांधले तसेच त्याच्या गळ्याभोवतीसुद्धा एक दोरी टाकली होती. या तरुणाला खुर्चीला बांधल्यानंतर महिला वॉशरुममध्ये गेली. त्याचदरम्यान खुर्ची खाली पडली आणि तरुणाच्या गळ्याभोवतीचा दोर आवळला गेला. या वेळी श्वास कोंडला जाऊन तरुणाचा मृत्यू झाला. महिला बाहेर आली तेव्हा आपला जोडीदार जमिनीवर निपचित पडल्याचे तिला दिसलेे. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी लॉजमधील कर्मचार्‍यांना बोलावले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत तरुण आणि महिलेला मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. तूर्तास या प्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply