पनवेल ः वार्ताहर
पनवेल परिसरातील विविध सामाजिक संस्था, तसेच अनेक महिला मंडळांनी पनवेल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे उभे असून त्यांच्या प्रचारार्थ भाजप-शिवसेना, आरपीआय पक्ष व मित्रपक्षांसह आता विविध सामाजिक संस्था, संघटनासुद्धा सहभागी झाल्या आहेत. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आदी भागांतील विविध सामाजिक मंडळे व महिला मंडळे आता प्रचारात उतरले असून ते मोठ्या धडाकेबाज पद्धतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करताना दिसत आहेत. महिलावर्ग प्रचारात उतरल्याने घराघरात जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचे परिचयपत्र व त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देताना दिसत आहेत. एकंदरीत प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून, येत्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper