Breaking News

सिडकोची पात्र व अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको महागृहनिर्माण योजना 2018-2019 च्या पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जदारांना स्वत:च्या लॉगीनमध्ये जाऊन माय अप्लिकेशनवर क्लिक करून पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना तफावत आढळून आली आहे अथवा ज्या अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा अपात्र अर्जदारांना अपिल करण्यासाठी 15 दिवसांची मुदत सिडको गृहनिर्माण योजना 2018-19च्या माहिती पुस्तिकेतील नियमाप्रमाणे देण्यात आली आहे. सदरची संधी अंतिम असून या कालावधी नंतर अपात्र अर्जदारांना अपिलाची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, तसेच एकापेक्षा जास्त वेळा विहीत कालावधीत अपिल मान्य करता येणार नाही. अर्जदारांना दिनांक 10 जून 2019 दुपारी 12 वाजल्यापासून अपिल करण्यासाठी सिडकोच्या ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग, अपॉईंटमेंट दिनांक 13 जून 2019 पासून दिनांक 3 जुलै 2019 या कालावधी करिता घेता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. अपिलाकरिता अर्जदारांनी सर्व कागदपत्रे त्यांनी घेतलेल्या अपॉईंटमेंटनुसार सोबत घेऊन यावीत. कागदपत्रांची पुनर्पडताळणी करण्यात येऊन पात्रतेबाबतचा निर्णय घेण्यात येईल व तो संबंधित अर्जदारांना संकेतस्थळाच्या माध्यमातूनच कळविण्यात येईल. संकेतस्थळावरून निश्चित केलेल्या भेटीच्या वेळेशिवाय अर्जदारांकडून कोणतेही अपील स्वीकारले जाणार नाही. अर्जदारांनी अधिक माहितीकरीता कॉल सेंटर नं. 022-62722250 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply