पाली : प्रतिनिधी
दिवाळीनिमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सुधागड व खालापूर तालुक्यातील कळंब कातकरवाडी, बावधन व चावणी या आदिवासी वाड्यांतील मुलांना फराळाचे, तर आदिवासी बांधवांना ब्लाँकेट, जेवणाचे ताट आणि महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
दुर्गवीरच्या शिलेदारांनी सर्वप्रथम कळंब कातकरवाडी गाठली. तेथील प्राथमिक शाळेचे शिक्षक चव्हाण यांच्या सोबत कातकरवाडी या आदिवासी पाड्यात फराळ, ब्लाँकेट, साडी, जेवणाचे ताट वाटप केले. त्यानंतर येथील लहान मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर खालापूर तालुक्यातील उंबरखिंडीत विजय स्मारकाची पूजा करण्यात आली. पुढे बावधन आणि चावणी गावीदेखील फराळ, ब्लाँकेट, साडी, जेवणाचे ताट वाटप करून दुर्गवीर प्रतिष्ठानने आदिवासींची दिवाळी आनंदी व गोड केली. या मोहिमेस सुजल शिवलकर, संजय भाट, सचिन जगताप, प्रज्वल पाटील, सचिन पवार, देवेश सावंत, भूषण पवार, नील मयेकर आणि दुर्गवीर टीम उपस्थित होती.
आपलं घर दिव्यांनी उजळताना कुणा गरजवंताच्या घरात मदतीची पणती प्रज्वलित करणे, हे आपले कर्तव्य समजून दुर्गवीर प्रतिष्ठान अनेक वर्षे फराळ, ब्लाँकेट, साडी वाटपाचा उपक्रम राबवीत आहे.
-संतोष हसुरकर,
संस्थापक अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान