Breaking News

आजिवली येथे शासकीय दाखले वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार आजिवली येथे जनता विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला.
या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा भागीत, ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते योगेश लहाने, घनश्याम पाटील,  महेंद्र गोजे, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव यांच्यासह  तहसील कार्यालय अधिकार्‍यांची उपस्थिती होती.    
रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमिसाईल, आधार कार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो.
नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार ग्रामीण व शहरी भागात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली व आजिवली येथे दाखले वाटप शिबिर झाले असून 8 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात, तर 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गव्हाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिबिर होणार आहे. या शिबिरात रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply