Breaking News

म्हाडाची सोडत जाहीर ; राशी कांबळे पहिल्या भाग्यवान विजेत्या

मुंबई ः प्रतिनिधी

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकीय लॉटरीला रविवारी (दि. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाइटवरून केले जात आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी हीींिं://ाहरवरर्.ीलरीीं.ळप  या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला. या वेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, मुंबई मंडळाचे मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

गिरणी कामगारांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. सेन्च्युरी, श्रीनिवास मिलच्या कामगारांसाठी 3800 घरांची ऑगस्टमध्ये लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या 217 सदनिकांच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे. सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे हीींिं://श्रेीींंशीू.ाहरवर.र्सेीं.ळप आणि हीींिं://ाहरवर.र्सेीं.ळप या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत. यंदाच्या सोडतीत अल्प उत्पन्न गटाकरिता 170, तर मध्यम उत्पन्न गटाकरिता 47 सदनिकांचा समावेश आहे. मुंबईतील 217 सदनिकांची लॉटरी 21 एप्रिलला जाहीर होणार होती, मात्र लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. या घरांसाठी तब्बल 78 हजार 773 जणांनी अर्ज केले होते, मात्र त्यापैकी 66 हजार 99 जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील 217 घरांचा समावेश आहे. म्हाडाच्या 276 दुकानांचा शनिवारी ई-लिलाव होणार असून मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षानगर (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावेनगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी-मालाड येथील 201 गाळ्यांचा, तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळींज, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील 77 सदनिकांचा समावेश आहे. सोडतीच्या निकालासाठी म्हाडा भवनात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता म्हाडाने चोख व्यवस्था ठेवली होती.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply