Breaking News

कामोठे येथे भव्य चित्रकला स्पर्धा

कामोठे : रामप्रहर वृत्त

दिशा महिला मंच (साई मीडिया) आणि नवी मुंबई मैथिल ट्रस्ट आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे येथे बालदिनानिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे 220 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दामाजी गणपत गोवारी स्कूलचे संस्थापक सूरदास गोवारी, हिलिंग टच क्लिनिकचे डॉ. रजत जाधव, नवी मुंबई मैथिल ट्रस्टच्या सदस्य रेखा पाठक, राजकुमार झा, अवधेश मिश्रा, दिशा महिला मंचच्या संस्थापक निलम आंधळे, हर्षाली गवंडे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, सेक्रेटरी खुशी सावर्डेकर, सुशील शर्मा आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व स्पर्धकांना रोटरी क्लबतर्फे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून जया कातुरे यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या मोहिते यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांचनमाला वाफारे, स्मिता देसाई यांनी मोलाचे

सहकार्य केले.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply