Breaking News

जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील  छताचा प्लास्टरचा भाग अचानक पडला. मंगळवारी (दि. 26) रात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत रुग्णाला मोठी हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव भेडसावत आहे. स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गळती लागली आहे. इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयांचे कडी-कोयंडे तुटले आहेत.शस्त्रक्रिया वार्डमधील स्लॅबच्या प्लास्टरचा भाग मंगळवारी रात्री एका रुग्णाच्या बेडवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. रुग्णालयाची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply