Breaking News

पोलादपूरमध्ये चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

पोलादपूर : प्रतिनिधी : चित्रकलेतही करिअर शक्य असल्याची जाणीव पालकवर्गात होऊ लागली असल्याने चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे, असे मत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रमोद दीक्षित यांनी व्यक्त केले.पोलादपूर शहरातील महिला उत्कर्ष समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद दीक्षित बोलत होते.माई शेठ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलिका अधिकारी यांनी केले. या वेळी पहिल्या गटात यश संदेश पालकर, सईज्ञा संजय जाधव, रिषभ प्रकाश सुतार यांना अनुक्रमे पहिली तीन बक्षिसे, तर दुसर्‍या गटात सार्थक वैभव वनारसे (प्रथम), मनस्वी नाईकनवरे (द्वितीय) आणि ओंकार संतोष सुतार (तृतीय), तर तिसर्‍या गटामध्ये हर्षद जाधव (प्रथम), नील मांढरे (द्वितीय), श्रेया बाटे (तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.  स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच बालकांना प्रत्येकी एक पेन्सील, शार्पनर आणि खोडरबर भेट देण्यात आला. या वेळी शिक्षिका प्राजक्ता मोरे, कला शिक्षक पाटील, जनसेवा प्रशालेचे विकास मांढरे यांच्यासह स्पर्धक व त्यांचे पालक  उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकारी कलिका अधिकारी, अस्मिता पवार, ज्योत्स्ना केसरकर, रोशनी दीक्षित, ज्योती उतेकर, माई शेठ, सपना बुटाला आणि साक्षी राणे आदींनी चित्रकला स्पर्धा घेतली. तिला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply