Wednesday , February 8 2023
Breaking News

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे वर्चस्व

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने वर्चस्व मिळविले असून, सर्व सभापतीपदे काबीज केली आहेत.

कर्जत नगर परिषदेत महायुतीचे बहुमत असून संख्याबळामुळे महायुतीला सर्व विषय समित्यांची सभापती पदे मिळाली आहेत. बुधवारी (दि. 6) नगर परिषद कार्यालयात पीठासीन अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांची निवडणुक घेण्यात आली. सत्ताधारी महायुतीकडून गटनेते नितीन सावंत आणि विरोधी राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी आपल्या विषय समिती सदस्यांची नावे पीठासीन अधिकार्‍यांकडे दिली. त्यानुसार स्थायी समितीवर अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष सुवर्णा केतन जोशी आणि सदस्य म्हणून अशोक ओसवाल, संचिता पाटील, राहुल डाळिंबकर, विशाखा जिनगरे यांची निवड झाली. आरोग्य आणि स्वच्छता समितीचे सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांची तर सदस्य म्हणून वैशाली मोरे, विवेक दांडेकर, शरद लाड, उमेश गायकवाड यांची निवड झाली. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण समितीचे सभापती म्हणून संचिता संतोष पाटील यांची तर सदस्य म्हणून विवेक दांडेकर, स्वामिनी मांजरे, सुवर्ण निलघे, सोमनाथ ठोंबरे यांची निवड झाली.सार्वजनिक बांधकाम शहर नियोजन आणि विकास समितीवर सभापती म्हणून राहुल डाळिंबकर यांना तर सदस्य म्हणून बळवंत घुमरे, नितीन सावंत, भारती पालकर, मधुरा चंदन यांना संधी मिळाली आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून विशाखा जिनगरे यांची, तर उपसभापती म्हणून प्राची डेरवणकर यांची तसेच सदस्य म्हणून स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, ज्योती मेंगाळ यांची निवड करण्यात आली. विषय समिती निवडणुकीत पीठासीन अधिकारी परदेशी यांना कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सहकार्य केले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply