पनवेल : रामप्रहर वृत्त : कोळखे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या लाझमिन फिरोज खान पठाण यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी सरपंच विजया सुरते, सदस्य कैलास मुंढे, अजय पाटील, मंगेश म्हात्रे, अपेक्षा जाधव, सारिका जाधव, ज्योती मंजुळे, कुंदा डाकी, सुहास वारे, गणेश सुरते, भास्कर मुंढे, ज्ञानेश्वर जितेकर, विलास भोईर, सिराज कुरेशी, तनवीर पठाण, आसीफ पठाण, नदीम शेख, तौसीफ मोमिन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper