Sunday , October 1 2023
Breaking News

पनवेल तालुक्यात विकासाचा झंझावात

मालडुंगे येथे समाज मंदिराचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त : तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून मालडुंगे येथील ताडपट्टी वाडी येथे समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, मालडुंगेच्या सरपंच हर्षदा चौधरी, उपसरपंच राजू वाघ, सदस्य अलका खंडावी, रंजना पारधी, ग्रामविकास अधिकारी रवींद्र म्हात्रे, चाहूशेठ चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

अंगणवाडीला फिल्टर, डस्टबीनचे वाटप

पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायतीमध्ये 14वा वित्त आयोग आणि महिला बालकल्याण 10 टक्के खर्च निधीमधूनशाळा-अंगणवाडीत पाण्याचा फिल्टर देण्यात आला, तसेच कचर्‍याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी डस्टबीनचे वाटपही करण्यात आले. या साहित्यांचे वाटप भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य शेखर शेळके, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाशेठ भोईर, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, सरपंच हर्षदा चौधरी, उपसरपंच राजू वाघ, माजी सरपंच चाहूशेठ चौधरी, मैनाबाई भगत, गणेश शिंदे, जोमा निरगुडा, काळू वाघा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी …

Leave a Reply