Breaking News

भिंगार,आरिवलीत रस्त्याचे कॉँक्रिटीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पार्टी आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे सातत्याने सुरूच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील भिंगार आणि आरिवली गावामध्ये रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. भिंगार व आरिवलीत काँक्रिटीकरणाचे काम स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा  उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भिंगारचे माजी सरपंच राम गोजे, योगेश लहाने, निलेश पवार, कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे, ज्ञानेश्वर पाटील, हुसेन शेख, अशोक पाटील, संदेश पाटील, भालचंद्र मढवी, चित्राताई परब, जयवंत पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply