Breaking News

बोरघाटात अपघात; तिघे जखमी

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासच्या काही अंतरावर असलेल्या रस्ते विकास करणार्‍या आफ्कॉन कंपनीच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी 5च्या सुमारास एक टेम्पो (एमएच 46 ई-3136) मुंबईच्या दिशेने जाणार्‍या पुढील वाहनाला धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक्स्प्रेस वेवर अफ्कॉन कंपनी ही रस्ते विकास करणारी कंपनी काम पाहते. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणार्‍या तीन लेन बंद करून फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने बोरघाटातून येत असताना वाहनांचे ब्रेक फेल होण्याच्या घडत असून, या ठिकाणी मागील तीन महिन्यांत किमान नऊ अपघात घडले आहेत. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, तर डोंगर पोखरले जात असताना एका कारवर डोंगराचा काही भाग पडून कार या ढिगार्‍याखाली दबली गेल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी घडल्याचे समोर आले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply