Breaking News

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. रविवारी (दि. 1) विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, अशी माहिती पटोले यांनी सभागृहाला दिली आणि फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड जाहीर केली. फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी भाषणही केले. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply