मोहोपाडा ः वार्ताहर
जागतिक एड्सदिनानिमित्त निबोंडे व दांडवाडी या गावांमधील नागरिकांना एचआयव्ही व एड्स बाबत मार्गदर्शन करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबुलकर यांच्या सौजन्याने व हेमचंद्र पारंगे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अशोक लोंढे यांच्यावतीने निंबोंडे निखाई माता मंदिरात आरोग्यविषयक मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे राबविण्यात आले.
यावेळी शिबिरात उपस्थित नागरिकांना एच. आय. व्ही. एड्सविषयक मार्गदर्शन करुन विविध तपासण्या करण्यात आल्या. यात थायरॉईड, हिमोग्लोबिन, सी.बी.सी, कॅल्शिअम, कोलोस्टॉरॉल, एल.एफ.टी या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी चौक रुग्णालयाच्या अशोक लोंढे व महालॅब प्रयोगशाळा तंत्रज्ञ तृप्ती लबडे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा जवळपास 75 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेखा मिसाळ, नाथा पवार, आनंत मिसाळ, दत्तात्रय मिसाळ गावाचे पाटील काका, महादु पवार, रामदास पारंगे, बंडू पारंगे, आदिनाथ मिसाळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबुलकर यांनी अथक परिश्रम घेतले.