Breaking News

पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन

पनवेल : वार्ताहर

सलग 24व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, को. ऑडिनेटर राजाभाऊ गुप्ते, संतोष आंबवणे व प्रसिद्धिप्रमुख रमेश भोळे यांनी दिली. या पनवेल फेस्टिव्हलमध्ये पनवेलकरांसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्याची अनेक साधने आणि दररोज स्थानिक तसेच नामवंत कलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पनवेलवासीयांनी या फेस्टिव्हलला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply