Breaking News

कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खंदे समर्थक व आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र जोशी हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत असताना कामोठे विभागात पक्ष मजबूत व बळकट करण्यासाठी अहोरात्र मेहनत केल्यानेच त्यांची कामोठे शहर मंडल अर्थात तालुका दर्जा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रवींद्र जोशी यांचे सामाजिक व पक्षनिहाय काम पाहता लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी जोशी यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.  रवींद्र जोशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अनेक पक्षप्रवेश घडवून आणले होते, तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून कामोठे शहरात भाजप घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांची कार्यप्रणाली पाहून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी तसेच कामोठे विभागातील भाजपच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांनी रवींद्र जोशी यांच्या नावाला अनुमती दिल्याने रवींद्र जोशी यांची कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप नेते राजेश गायकर, संतोष भगत यांसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply