पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नेरे येथील शांतीवनात जाऊन कुष्ठरुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप केले. या वेळी भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर, जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, अॅड. जितेंद्र वाघमारे, राजू ठोकळ, प्रेम डुकरे, हेमांगी वाघमारे, भारती घरत, ज्योती आवटे, माधुरी गायकवाड, आंबेकर मॅडम, रोहिणी दुबळे आदी उपस्थित होते. याचबरोबर मालधक्का परिसरात कुष्ठरुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन नगरसेविका अॅड. वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी नगरसेविका सुशीला घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, अॅड. जितेंद्र वाघमारे, अशोक आंबेकर, रूपेश वाहुळकर, राहुल वाहुळकर, जरिना शेख, लक्ष्मी चव्हाण, माने ताई, नंदा टापरे, ललिता म्हात्रे आदींसह नागरिक उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper