Breaking News

सुकापूरमध्ये रस्तेकामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाली देवद-सुकापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपसरपंच आलुराम केळी, ज्येष्ठ नेते पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भाजपचे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, आत्माराम पाटील, उदय म्हस्कर, महेश केणी, रूपेश पाटील, पेमोद पोपेटा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. पाली देवद-सुकापूर येथील समृध्दी भूमी सोसायटी ते एक्स्प्रेस वेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply