पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कामोठे कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाचे महोत्सवाचे 9वे वर्ष असून, 2 ते 5 जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) झाला.
2 ते 5 जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या महोत्सवात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, महोत्सवाचे आयोजक नगरसेवक दिलीप पाटील, बाबासाहेब तुपे, पोलीस निरीक्षक रवींद्र म्हात्रे, गोपीनाथ गोवारी, मंदार पनवेलकर, नवनाथ साबळे, अर्जुन गोवारी, अतुल गोवारी, अशोक गोवारी, सुधाकर पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला व त्यांना मार्गदर्शन केले.