Tuesday , February 7 2023

रूचिता लोंढे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याअंतर्गत रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ पनवेल शहरात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मनोहर ओझे यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 4) करण्यात आले.

या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, तेजस कांडपिळे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, अनिल भगत, मनोज भुजबळ, अजय बहिरा, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, वृषाली वाघमारे, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, उद्योजक राजू गुप्ते, अमरिश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, संजय जैन, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, दौलत देशमुख, मनोहर मुंबईकर, गुरुनाथ लोंढे, जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, मंगेश पिळवळकर, प्रशांत करपे, नितीन वास्कर, दर्शन ठाकूर, प्रशांत झुंझारराव, प्रमोद म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, जगदिश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रचारात जोरदार आघाडी

पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील गुरुशरणम आणि कल्पतरू सोसायटी परिसरात भाजप, आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 5) दणक्यात प्रचार केला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांची कन्या रूचिता लोंढे यांना भाजप, आरपीआयच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, संजय भगत, भार्गवशेठ ठाकूर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, अर्चना परेश ठाकूर, स्वाती कोळी, उदीत नाईक, विशालशेठ ठाकूर, अमित ओझे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply