उरण : बातमीदार
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रुद्राक्षी टेमकर या एका नऊ वर्षीय मुलीने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमीचे सागरी अंतर अवघ्या आठ तासांत पोहून पूर्ण केले आहे. जोरदार वारा व उंच लाटांचा प्रतिकार करीत तिने आपले लक्ष साधले.
रुद्राक्षी ही शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विद्यालयात इयत्ता चौथीत शिकते. मूळची शहाबाज कमळपाडा (ता. अलिबाग) येथील रुद्राक्षीने शनिवारी (दि. 4) सकाळी 7च्या सुमारास रेवस जेट्टी येथून समुद्रात उडी घेतली. अत्यंत चिकाटीने ती गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली.
या वेळी तिच्या स्वागतासाठी तिचे पालक, ग्रामस्थ, जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, मुख्याध्यापक रमाकांत गावंड, आयोजक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर, निरीक्षक दत्ता तरे, जि. प. सदस्य विजय भोईर, डॉ. मढवी, उरण जलतरण तलावाचे व्यवस्थापक जाधव, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संदेश बँकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुद्राक्षीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कमळपाडा ग्रामस्थांनी रुद्राक्षीची गावातून मिरवणूक काढून तिचा गौरव केला. त्याचप्रमाणे तिच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा कोल्हे, पर्यवेक्षक शशिकांत म्हात्रे, सुजा शिवरामन यांनीही विद्यार्थ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत म्हात्रे यांनी केले.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …