Breaking News

मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी केली भिवपुरी रोड रेल्वेस्थानकाची पाहणी

 रेल्वे प्रवासी संघाने दिले मागण्यांचे निवेदन

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी शनिवारी (दि. 12) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांनी केली. त्या वेळी रेल्वे प्रवासी संघाने महाव्यवस्थापक गोयल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात पादचारी पुलाची दुरुस्ती, स्थानकात पोहचण्यासाठी असलेल्या रस्त्यांची आणि नियोजित कारशेड परिसराची पाहण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल शनिवारी आले होते. ते लोणावळा, कर्जत असे भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात पोहचले. या वेळी भिवपुरी रोड प्रवासी संघाचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कोषाध्यक्ष महेश कडव, सल्लागार अ‍ॅड. उत्तम गायकवाड, अपंग प्रतिनिधी अमर साळोखे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र राऊत, अशोक गायकवाड, सुप्रेश साळोखे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकाच्या कर्जत बाजूकडील पादचारी पुलापासून डायमंड वसाहतीपर्यंत रेल्वे मार्गाला समांतर रस्ता तयार करणे, बार्डी गावाला जोडणारा (जिप डांबरी रस्त्यापर्यत) रस्ता तयार करणे, पादचारी पुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाऊडस्पीकर बसविणे, रेल्वे स्थानकात पोलीस चौकी उभारणे, रेल्वे स्थानक ते गारपोली रस्ता करणे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply