Breaking News

पिरकोन येथे श्री समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : वार्ताहर
तालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून, विजेत्या संघास 1,01,111 रु., उपविजेत्या संघास 50,555 रु. व दोन्ही संघांना भव्य चषक देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप तालुका सरचिटणीस दीपक भोईर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, देवेंद्र पाटील उर्फ डेव्हिस, तालुका उपाध्यक्ष शशी पाटील, पूर्व विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, सुभाष गोसावी, मिलिंद मोटगरे, माजी उपसभापती नित्यानंद भोईर, पिरकोन अध्यक्ष मुकुंद गावंड, पाणदिवे उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, आयोजक मुकुंद गावंड, भार्गव म्हात्रे, निलेश पाटील, अनिल पाटील, नरेंद्र गावंड, गजानन गावंड, कल्पेश गावंड आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply