Breaking News

नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत मोठा समजला जाणारा 23वा अय्यप्पा महोत्सव येथील प्रभूआळीतील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर, हनुमान मंदिर परिसरात रविवारी (दि. 12) धार्मिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ पहाटे पाच वाजता महागणपती होमाने करण्यात आल्यानंतर सहा वाजता अय्यप्पा स्वामींची प्रतिष्ठापना व पहिल्या सत्रात उषा पूजा, मध्यान्ह पूजा असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दुसर्‍या सत्रात रात्री नऊ वाजता महादिपाराधना व त्यानंतर 9.30 वाजता या बहारदार धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात नागोठणे शहर तसेच विभागासह रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील हजारो भाविक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष के. वाय. सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली सी. के. प्रदीपन, वेणूगोपाळ पंडित, सी. एन. चंद्रराज, टी. के. विनायक, ओमनकुट्टण नायर, पी. के. जॉन, ए. मोनाचन, के. पी. जयदेवन, के. आर. नायर, पी. आर. सोमण, विन्सन वर्गीस, सी. व्ही. परमेश्वरन, के. ़के. शिवनकुट्टी, के. एस. राजेश, विजयकुमार नायर आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply